शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ दूध दरवाढीचा संघर्ष पेटला दूध उत्पादकांचा प्रतिमोर्च : गाय दूधास अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:34 IST

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे आर्थिक केंद्र असलेल्या ‘गोकुळ’चा सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे.

कोल्हापूर :जिल्ह्याच्या राजकारणाचे आर्थिक केंद्र असलेल्या ‘गोकुळ’चा सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. गाईच्या दुधास दोन रुपये दरवाढी देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी काढलेल्या मोर्चास आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघातील सत्तारूढ गटाने विराट प्रतिमोर्चा काढून जोरदार प्रत्युत्तर दिले.

‘गोकुळ’हा देशात नावाजलेला दूध संघ असून, अशा संस्थेची बदनामी यापुढे सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. राज्य शासनाने गाईच्या दुधास लिटरमागे प्रत्येकी पाच रुपयांचे अनुदान थेट उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली व तसे लेखी निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

गेल्या आठवड्यात आमदार पाटील यांनी मोर्चा काढून ‘गोकुळ’च्या कारभारावर व संचालकांच्या उधळपट्टीवर टीकेची झोड उठविली होती. या संस्थेचा वापर महाडिक यांच्या खासगी मालमत्तेसारखा होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तो जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेऊन हा निषेध मोर्चा व जागृती मेळावा काढला. त्यामध्ये महिलांसह गावोगावचे उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

माजी आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘महाडिक व पाटील यांनी त्यांच्या स्वत:च्या राजकारणात ‘गोकुळ’चे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. ही चांगली चाललेली संस्था राजकीय आरोप-प्रत्यारोप करून बदनाम होणार नाही याची दक्षता घ्या.’महादेवराव महाडिक म्हणाले,‘ गोकुळ हे महाडिक कुटुंबांचे शक्तिस्थान आहे. त्याकडे वाकड्या नजरेने कोण पाहू लागले तर उत्पादकच त्यांना पुरून उरतील.’महाडिक यांच्या टँकरची यादीच जाहीरहा मोर्चा संपल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाडिक यांच्या २३ टँकरची यादीच जाहीर केली. खासदार महाडिक हे आमच्या गोरगरीब कार्यकर्त्यांचे हे टँकर आहेत असे सांगत असतील तर मग ४५ लाखांचा टँकर घेणारे कोण गरीब कार्यकर्ते आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हानही पाटील यांनी दिले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण